Saturday, December 21, 2024
Homeआरोग्यविषयकजेवण पचवण्यासाठी काय खावे? जास्त जेवल्यानंतर असं पचवा अन्न

जेवण पचवण्यासाठी काय खावे? जास्त जेवल्यानंतर असं पचवा अन्न

काही लोक आवडीचे अन्न मिळाल्यास गरजेपेक्षा जास्त जेवतात. त्यामुळे नंतर त्यांना पोटाशी संबंधित समस्या किंवा थकवा येऊ लागतो. तुम्ही देखील कधी गरजेपेक्षा जास्त जेवलात (Overeating) तर अन्न लवकर पचण्यासाठी (Digestion Tips) काही पद्धती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला या पद्धतींची माहिती असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे तुमच्या अनेक समस्या टळू शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे जास्त प्रमाणात जेवण केल्यानंतर अन्न पचण्यासाठी काय करावे (What to eat to digest meal) याबाबत सांगणार आहोत.

अन्न पचवण्याचे सोपे मार्ग

ही समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने तुम्हाला खूप मदत करू शकतात. यासाठी पुदिन्याची पाने नीट धुवून चावून खा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुदिन्याचा चहा पिऊ शकता. असे केल्याने उलट्या आणि मळमळण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

कोमट पाण्यात काळं मीठ आणि लिंबू घालून ते पिल्यास या समस्येवर मात करता येते. यासाठी जेवणानंतर या पाणी थोडं कोमट करा आणि त्यात लिंबू किंवा काळं मीठ घालून प्या. असे केल्याने तुमची समस्या लवकरच दूर होईल.

याशिवाय तुम्ही कोमट पाण्यात हिंग मिसळून प्यायल्यास तुमची समस्या दूर होऊ शकते. यामुळे अपचनाच्या समस्येपासून मुक्ती मिळते, शिवाय अन्नही लवकर पचते.

दह्यामध्ये भाजीपाला मिसळून खाल्ल्याने थकवा व्यतिरिक्त उलटी आणि मळमळ होण्याच्या समस्येवरही मात करता येते. तु

तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ले असेल तर दह्यात ओवा घालून खा. असे केल्याने तुमची समस्या दूर होईल.

(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -