Tuesday, July 8, 2025
HomeमनोरंजनDisha Patani सोबतच्या ब्रेकअपनंतर Tiger Shroff म्हणाला - 'मी सिंगल आहे आणि...

Disha Patani सोबतच्या ब्रेकअपनंतर Tiger Shroff म्हणाला – ‘मी सिंगल आहे आणि चांगल्या पार्टनर शोधतोय’

बॉलिवूडचा सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी यांच्या रिलेशनशिपबद्दल नेहमी चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु होत्या त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. या फक्त चर्चा होत्या यावर दोघेही काहीच बोलले नव्हते. पण आता टायगर श्रॉफने या रिलेशनशिपबद्दल मौन सोडले आहे. त्याने जे सांगितले त्यावरुन आता दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म झाले आहे. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला.

टायगर श्रॉफ लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये क्रिती सेननही त्याच्यासोबत स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे. यावेळी टायगरने दिशा पाटणीसोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. बऱ्याच दिवसांनंतर टायगरने या रिलेशनशिपबद्दल आपले मत मांडले त्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. या शोमध्ये टायगर म्हणाला की, ‘मला वाटतंय की मी सिंगल आहे. मला वाटतं मी चांगल्या पार्टनरच्या शोधात आहे. सध्या मी डेट करण्यासाठी कोणाला तरी शोधत आहे.’ टायगरचे हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसला.

यावेळी टायगर श्रॉफने त्याला आवडत असलेल्या अभिनेत्रीबद्दल देखील सांगितले. तो म्हणाला की, ‘मी नेहमीच श्रद्धा कपूरकडे आकर्षित होतो. ती खूपच ग्रेट आहे, असे मला वाटतं. टायगर श्रॉफच्या या बोलण्यावरुन नक्कीच दिशा आणि त्याचे ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म वाटत आहे. जरी टायगर आपल्या रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलला असला तरी सुद्धा त्याच्या आणि दिशाच्या ब्रेकअपबद्दल त्यांच्या चाहत्यांना अजुनही विश्वास बसत नाहिये.

दरम्यान, टायगर श्रॉफ अभिनेत्री दिशा पटानीला गेल्या 6 वर्षांपासून डेट करत होता. पण दोघांनी कधीच आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली नव्हती. नेहमी ते अनेक ठिकाणी फिरताना, पार्टीमध्ये स्पॉट व्हायचे. त्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. महत्वाचे म्हणजे त्यांची जोडी देखील सर्वांना आवडत होती. पण आता दोघांचे ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म झाले असून तो नवीन पार्टनरच्या शोधामध्ये असल्याचे त्याने स्वत: सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -