Tuesday, July 8, 2025
Homeसांगलीमिरजेत गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला डॉल्बीच्या ध्वनी मर्यादा भंग: चार गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांची...

मिरजेत गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला डॉल्बीच्या ध्वनी मर्यादा भंग: चार गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांची कारवाई

मिरज / प्रतिनिधी
मिरजेत गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला डॉल्बीचा दणदणाट करून मिरवणूक काढणाऱ्या चार गणेशोत्सव मंडळांवर मिरज शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.मंगळवारी शहरातील गणेशोत्सव चार मंडळांनी आपल्या गणेश मंडळाची मिरवणूक काढली होती.यामध्ये आवाजाची मर्यादा न पाळता नियम मोडल्याबद्दल पोलिसांनी कारवाई केली आहे.

यामध्ये

1)मंगळवार पेठचा राजा गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष सुनील काकडे ,डॉल्बी चालक अविनाश कोरवी कोरोची जि
कोल्हापूर
2) श्री राम गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष रोहन चोरगे आणि डॉल्बी चालक
3) शनिवार पेठचा राजा गणेशोत्सव मंडळ, अध्यक्ष अजिंक्य गवळी,डॉल्बी चालक गणेश सतीश खरात रा फुरसंगी
4) मिरजेचा सम्राट दत्तमंदिर गणेशोत्सव मंडळ,भारत नगर अध्यक्ष अब्दुल रजाक गौस मुजावर, डॉल्बी चालक सुशांत शिवाजी पाटील मालगाव रोड मिरज डॉल्बी चालक शुभब बाळू जगताप, पुणे यांच्यावर ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत न्यायालयात खटला पाठविण्यात येणार आहे.

तसेच या मंडळाचे डॉल्बी साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -