भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनाप्रमाणे 1 ऑगस्ट 2022 पासून मतदान ओळखपत्र आधार कार्ड क्रमांक जोडणी करण्याची मोहीम शासनाच्या वतीने सुरू झाले आहे. तरी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांनी ज्या मतदान केंद्रावर आपले नाव नोंद असेल त्या मतदान केंद्राचा अधिकारी बी. एल ओ यांच्याशी संपर्क साधून आपल्या मतदार ओळखपत्रांची आधार कार्ड क्रमांक जोडणी करुन घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या 3 लाख 10 हजार 914 इतकी आहे. यातील केवळ 82000 मतदाराने आपले आधार कार्ड लिंक करून घेतले आहे. आधार कार्ड क्रमांक जोडणीसाठी बी एल ओ व त्या त्या गावात घरोघरी जाऊन आधार कार्ड क्रमांक लिंक करून घेण्यासाठी काम करीत आहेत. त्यांना सहकार्य करावे आधार कार्ड क्रमांक मतदान ओळखपत्राची जोडणी करुन घ्यावा असेही आमदार यड्रावकर यांनी म्हटले आहे.