ताजी बातमी ऑनलाईन टीम
तुम्ही कधी तुमच्या नजरेसमोर एखाद्याला हृदय विकाराचा झटका आलेला पाहिलाय का? जर आलाच तुमच्यासमोर तर? काय कराल? आपण काय डॉक्टर नाही त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव सगळ्यांना आहे. एखाद्याला हृदय विकाराचा झटका यावा आणि डॉक्टर (Doctor) समोरच असावा अशी इच्छा प्रत्येकजण ठेवेल. किती छान ते नशीब असावं पण इतक्या इमर्जन्सीच्या काळात (Emergency) समोरच डॉक्टर! असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येतो आणि समोरच डॉक्टर असतो.
व्हिडीओ बघा फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येता येता राहिलाय. एक व्यक्ती डॉक्टरांकडे आलेला असतो. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं की रोजच्याप्रमाणे दवाखान्यात काम सुरु असतं.
डॉक्टर आलेले पेशंट तपासात असतात. समोर दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. बाजूला एक महिला पेशंट आहे. समोर निळा शर्ट घालून बसलेल्या एका व्यक्तीला काही वेळानं हृदय विकाराचा झटका येतो. व्हिडीओ बघताना पटकन ही गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा डॉक्टर उठून पेशंट जवळ जातात तेव्हा ते व्हिडिओत दिसून येतं.