Sunday, August 3, 2025
Homeसांगलीगणेशोत्सव मिरवणूक नववी आणि अनंत चतुर्दशी दिवशी वाहतुक मार्गात बदल

गणेशोत्सव मिरवणूक नववी आणि अनंत चतुर्दशी दिवशी वाहतुक मार्गात बदल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गणेशोत्सव २०२२ मिरज शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.मिरज मध्ये मिरवणूका नवव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशी दिवशी खुप मोठ्या प्रमाणात निघत असतात. त्या अनुषंगाने वाहुतिकचे नियोजन करण्याकरीता मा.पोलिस अधिक्षक सो यांच्या आदेशानुसार मिरजेतील वाहतुकीमध्ये काही बदल केले गेले आहेत.यासाठी बाहेरुन गावावरुन येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

सोलापूरहून मिरज कडे येणाऱ्या वाहन धारकांनी किंवा सांगलीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सोलापूरहून येणाऱ्या वाहनांनी तासगाव फाटा, सुभाषनगर,विजयनगर,म्हैसाळ,कागवाडमार्गे कर्नाटक ला जायचं आहे. त्याचपध्दतीने सोलापूरकडून येणारे वाहने त्यांना कोल्हापूरकडे जायच आहे त्यांनी गांधी चौक,वंटमुरे काॅर्नर,भारती हाॅस्पिटल,विश्रामबाग,धामणी मार्गे कोल्हापूर कडे जायचे आहे.तसेच शास्त्री चौकाकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी म्हैसाळ,शास्त्री चौक, महात्मा फुले चौक मार्गे कोल्हापूर कडे जायचे आहे.तसेच शिरोळ ला जाणाऱ्या वाहनांनी महात्मा फुले चौक,रेल्वे ब्रीज,अंकली,उद्गार मार्गे शिरोळ कडे जायचे आहे.हे गणेशोत्सवाच्या नववी आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमुळे बदल केले गेले असल्याने सर्वांनी दक्षता घ्यावी.तसेच अनंत चतुर्दशी दिवशी जे नागरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणार आहेत त्यांच्या वाहन पार्किंगची सुविधा न्यु इंग्लिश स्कूल,मिरज हायस्कूल,आयडेल स्कूल, महात्मा फुले चौक, अण्णा भाऊ साठे पुतळा या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.तसेच मिरज वाहतूक शाखेचे ए.पी.आय अनिल माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मिरवणूक मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अडथळा आला तर त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.मिरवणुक मार्गाला अडथळा येईल अशी वाहने लावू नयेत असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -