ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरजेत गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणूकीत साऊंड सिस्टीमचा दणदणाट करीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणार्या गणेश मंडळांवर आणि साऊंड सिस्टीम मालकांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.या मंडळांकडून मिरज शहरात ३१ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणरायांची मोठ्या जल्लोषात प्रतिष्ठापणा करताना मिरवणूकी दरम्यान साऊंड सिस्टीमचा दणदणाट करीत आवाज मर्यादेचे उल्लंघन केले होते.आवाज मर्यादा ही ११३ डिसिबल आवाज मर्यादा आहे.
तर या साउंड सिस्टीम ची आवाज मर्यादा ही १२८ डिसिबल होती.पोलिस प्रशासनाकडून आवाज मर्यादित ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.तरीही आवाजाचा मर्यादा वाढविण्यात आली होती.यामध्ये सर्वोदय मंडळाला डाॅन नंबर 1 ही साउंड सिस्टीम लावली होती.साउड सिस्टीम मालकाला सांगून सुद्धा आवाज मर्यादा जास्त ठेवली होती.त्यानंतर आवाज मर्यादा वाढविण्यात आल्याचे यंत्राद्वारे स्पष्ठ होताच पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये सर्वोदय गणेश उत्सव मंडळाला लावलेला साऊंड डाॅन नंबर 1 हा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार एक वेगळी टीम स्थापन करण्यात आली होती.त्याचे इन्चार्ज पोलिस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे ह्यांच्याकडे होते.त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली आहे.आणि ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यांत आला आहे.तो न्यायालयात वर्ग करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत.तसेच पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी आवाहन केले आहे की उत्सव साजरा करा पण सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्यांचे पालन करुन उत्सव साजरा करा असे आवाहन केले आहे.