Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगलीत जीप अपघात दोन तरुण जागीच ठार... सहा जण जखमी

सांगलीत जीप अपघात दोन तरुण जागीच ठार… सहा जण जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नांद्रे येथील सांगली मार्गावर असणाऱ्या दर्गाह चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव जीपला अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील नांद्रे परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने दर्गाह समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोंखडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की लोखंडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्गाहाच्या भिंतीवर आदळली. दरम्यान, अपघातातील जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -