Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; यंदा 27 तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा...

कोल्हापूर ; यंदा 27 तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात..


गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई.. डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होत तरुणांसह अबाल वृद्धांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. कोल्हापूरच्या इ तिहासात पहिल्यांदाच तब्बल 27 तास मिरवणूक चालली. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर शैलेश बलकवडे यांच्या हस्ते शेवटच्या श्री भगतसिंग तरुण मंडळाच्या बाप्पाची आरती करून गणेश विसर्जन मिरवणुकीची सांग ता झाली. यावेळी पोलिसांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला.

मात्र मंडळानी ज्या त्या ठिकाणीच साऊंड सिस्टिम लावून पोलिसांच्या या भूमिकेचा विरोध केला. अनेक तरुण मंडळांनी त्याच ठिकाणी रात्र घालवली. सकाळी पुन्हा या मिरवणुकीला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच तब्बल 27 तास ही गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. पापाची तिकटी इथं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत श्री भगतसिंह तरुण मंडळ यांच्या बाप्पांची आरती करून विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी पोलिसांनी देखील मै हु डॉन या गाण्यावर ठेका धरला.

ही मिरवणूक 27 तास पार पडली असून कोल्हापूर पोलिसांनी केलेले बंदोबस्त आणि नियोजन यामुळे मिरवणुकीला कोठेही गालबोट लागले नाही. तसेच कोणतीही घटना घडलेली नाही. यंदा सार्वजनिक तरुण मंडळाने प्रशासनाच्या नियमांचे पालन केले असून पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -