Thursday, July 3, 2025
Homeसांगलीसांगलीत चहा विक्रेत्या वृद्ध महिलेचे दागिने लुटले

सांगलीत चहा विक्रेत्या वृद्ध महिलेचे दागिने लुटले

सांगलीत चहा विक्रेत्या वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. मिरज शहरातील आंबेडकर उद्यान नायरा पेट्रोल पंप जवळ ही घटना घडली आहे. रोशन बी खुदबुद्दीन पीरखान (वय ५८) दर्गाकमान कबाडे वाडा मिरज असे चहा विक्रेत्या वृद्ध महिलेचे नाव आहे. रोशन पीरखान या वृद्ध महिलेची चहा टपरी छत्रपती शिवाजी क्रीडांगण जवळ आहे.

याठिकाणी आलेल्या दोन अनोळखी इसमाने इमारत बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी चहा लागणार असल्याचे सांगत वृद्ध महिलेला रिक्षातून नायरा पेट्रोल याठिकाणी घेऊन गेले. रिक्षा मधून उतरून इमारतीच्या आडोशाला घेऊन जाऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील कर्णफुले आणि वृद्धाचा मोबाईल हिसकावून घेऊन रिक्षातून चोरटे पसार झाले.

या घटनेने घाबरलेल्या रोशन बी यांनी आरडाओरडा केला तोपर्यंत दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. रोशन यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, मोबाईल असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. महात्मा गांधी चौकी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -