Tuesday, May 14, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासचीही सोय

Kolhapur : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासचीही सोय

नवरात्रौत्सव काळात परगावगासह कोणत्याही स्थानिक भाविकांना अंबाबाईचे दर्शन जलदगतीने घेता यावे, यासाठी पेड स्वरुपात ईपासची सोय करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजातून मंदिरात सोडल्या जाणारया मुख्य दर्शन रांगेजवळूनच ई-पास काढलेल्या भाविकांची रांग मंदिरात सोडून त्यांना भरत मंदिराजवळून अंबाबाईच्या दर्शनास सोडण्याचेहे बैठकीत ठरवण्यात आले आहे.

बैठकीच्या प्रारंभी देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी तुळजापूरातील तुळजा भवानीमातेच्या दर्शनासाठी जशी पेड स्वरुपात ई-पास सेवा आहे, त्या धर्तीवर अंबाबाईच्या दर्शनासाठीही ई-पास सेवा सुरु करावी, असा मुद्दा मांडला. नवरात्रौत्सव काळात दररोज शेकडो भाविक अंबाबाईचे थेट दर्शन मिळावे यासाठी सातत्याने देवस्थान समितीकडे संपर्क साधत असतात. यामध्ये परगावसह व्हीआयपी लोकांचा मोठा समावेश असतो. तेव्हा याचा विचार करुन पेड स्वरुपात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पास सेवा सुरु केल्यास योग्य होईल, असेही नाईकवाडे यांनी बैठकीत सांगितले. त्यांच्या सांगण्याचा सारासार विचार करुन देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संपूर्ण नवरात्रौत्सवात ई-पास सेवा सुरु करण्यास सहमती दर्शवली.

दरम्यान, भाविकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com

या गतवर्षीच्या संकेतस्थळाद्वारेच ई-पास काढता येईल, असे नाईकवाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या हे संकेतस्थळ अपडेट केले जात असून ते येत्या आठ दिवसात भाविकांसाठी खुले केले जाईल. ई-पासच्या दर्शनासाठी दोनशे रुपये आकार स्वीकारण्याबाबत देवस्थान समिती विचाराधिन आहे. देवस्थान समितीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, एवढाच ई-पास पेड करण्यामागे उद्देश आहे, असेही नाईकवाडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -