वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेकांच्या हाताला काम मिळण्याची एक संधी उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस कर्मचारी निवृत्त होत आहेत.मात्र भरती करण्यास परवानगी नाही त्याचा परिणाम महापालिकेच्या कामावर होत आहे. महापालिकेच्या कामकाजास अधिक गती मिळण्यासाठी शासनाकडून तीन वर्षाच्या मुदतीसाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. इचलकरंजी महापालिका झाल्यामुळे कामांना गती मिळावी, अश्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
विविध कामे करतांना अत्यंत कमी मनुष्यबळाचाही प्रश्न भेडसावत आहे. सद्या अधिकारी प्रवर्गातील ४३ पदांच्या आकृतीबंधाला यापूर्वी मंजुरी मिळाली आहे. तर संपूर्ण आकृतीबंध मंजूर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्या तीन वर्षाच्या मुदतीने कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार त्याची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
तर होणारी ही भरती कंत्राटी पद्धतीने म्हणजेच तीन वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. यामध्ये 400 हून कर्मचारी विविध विभागांसाठी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी वार्षिक सुमारे ९ कोटी २५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार यातील अत्यंत गरजेच्या भरतीला प्राधान्य दिले जाणार आहे.६ अक्टोबर २०२२ दुपारी तीन वाजेपर्यंत टेंडर भरती करता येईल.
कंत्राटी पदे आणि पदसंख्या
बांधकाम विभाग – कनिष्ठ अभियंता(६),
बांधकाम पर्यवेक्षक(६),
विद्युत विभाग – कनिष्ठ अभियंता(१),
वीज तंत्री(२),
डी टी पी ऑपरेटर(२),
स्ट्रीटलाईट ऑपरेटर(४)
वाहन विभाग – ड्रायव्हर कम ऑपरेटर(२०),
फायरमन(४८),
पाणी पुरवठा विभाग – स्थापत्य अभियंता(४),
यांत्रिकी अभियंता(२),
कॉम्पुटर ऑपरेटर(२),
प्लंबर(६),
टर्नकी(२४),
वाचमन(९०)
ऑपरेटर(गाळणी चालक)(६),
मजूर(७६),
फिटर, इलेट्रीशियन(१२),
पंप चालक(४६),
मिळकत विभाग – रखवालदार(वाचमन)(४०)
रुग्णालय विभाग – वैद्यकीय अधिकारी(१),
स्टाफ नर्स (१),
एक्स रे तंत्रज्ञ,(१)
ई-गव्हरनर्स – कनिष्ठ संगणक अभियंता.(१)