Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीकडेगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयित आरोपी ताब्यात

कडेगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयित आरोपी ताब्यात

कडेगाव येथील अल्पवयीन पीडितेच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरात शिरून जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपी सचिन सुरेश पवार ( रा. निमसोड ता. कडेगाव ) यास कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन पवारच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेने कडेगाव शहरासह परिसरात निषेध व्यक्त केला जात आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना संशयित आरोपी याने एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पीडितेच्या राहत्या घरी तिचे आई-वडील घराबाहेर दुकानात गेले असल्याचे व घरी कोणी नसल्याचे पाहून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला.

पीडित एकटीच घरी असल्याचे पाहून संशयित आरोपी सचिन पवार याने बळजबरीने तू मला आवडतेस असे म्हणून पीडितेस मिठी मारली. त्यानंतर तिच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करु लागला तेव्हा फिर्यादीने त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पीडितेचे जबदस्तीने कपडे काढून तिची इच्छा नसताना पीडितेवर बलात्कार केला.

त्यानंतर सदरचा प्रकार कोणास सांगीतला तर तुला तसे तुझ्या आई व वडीलांनी जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यांनतर जुलै २०२२ मध्ये पुन्हा पीडित मुलगी कराड येथे कॉलेजला एस.टी. बसने जात असताना बसचा पाटलाग केला.

कराड- सैदापूर कॅनोल जवळ बसमधून पीडित खाली उतरलेनंतर तीच्या जवळ येऊन संशयित पवार याने फोन का उचलत नाही असे म्हणत मोठं मोठयाने आरडा ओरडा करीत शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -