Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : स्वत:ला भावपूर्ण श्रध्दांजली, स्टेटस ठेवत राशिवडेतील युवकाची आत्महत्या

कोल्हापूर : स्वत:ला भावपूर्ण श्रध्दांजली, स्टेटस ठेवत राशिवडेतील युवकाची आत्महत्या

भावपुर्ण श्रध्दांजली स्टेटस ठेवत राशिवडे बु (ता.राधानगरी) येथील संग्राम मधुकर कांबळे (वय ३२) या युवकाने स्वत:च्या घरात गळफास लावुन आत्महत्या केली. आत्महतेस पत्नी, सासु, सासरे, मेहुण्या आणि त्यांचे पती यांना जबाबदार धरुन कडक शिक्षा व्हावी असा अडीच मिनीटाचा व्हीडीओ केला आहे. या प्रकारामुळे राशिवडे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संग्राम कांबळेचे तीन वर्षापुर्वी लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर कौटुंबिक वादामुळे पत्नी अडीच वर्षापासून माहेरीच राहत होती. त्यांचा वाद न्यायालयात सुरु होता. संग्रामने अडीच मिनीटाचा व्हीडीओ तयार करुन पत्नी,सासु,सासरे,दोन मेहुण्या आणी त्याचे पती यांनी आत्महत्येस प्रवृत केल्याचे म्हटले आहे.या मंडळींना कडक शिक्षा व्हावी असे सांगुन स्वत: काढलेल्या कर्जाची आणी त्याच्या येणे बाकीची नावे सुध्दा सांगितली आहेत. या वादामुळे आई, वडीलांना त्रास होत असुन मलाही त्रास होत आहे असेही म्हटले आहे. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -