Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित शर्मा ठरला हीरो!

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित शर्मा ठरला हीरो!

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 8 ओवरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मोहालीत टी 20 लढतीत पराभवाला सामोरे जावे लागलेली टीम इंडिया नागपूर येथील मैदानावर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरला. मात्र, पावसामुळे खेळ विलंबाने सुरू झाला. त्यामुळे ही लढत केवळ 8 ओवरची झाली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, कर्णधार रोहित शर्मा याने 20 चेंडूत 46 धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, टीम इंडियासाठी आजची लढत महत्त्वाची होती. करो या मरो अशा परिस्थितीचा सामना टीम इंडिया करत होता. आता टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -