पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिच्यावर खुनी हल्ला केल्याचा प्रकार राजारामनगर (ता. वाळवा) येथे सोमवारी पहाटे घडला. या खुनी हल्ल्यात रशिका मल्लेश कदम (वय २८, रा. राजारामनगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. खुनी हल्ल्याप्रकरणी पती मल्लेश सिद्धाप्पा कदम (वय ४०)याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रशिका ही पती मल्लेश, मुलगा ओंकार, मुलगी विद्या यांच्यासमवेत राजारामनगर येथे वास्तव्यास आहे. रविवारी रात्री मल्लेश हा दारू पिऊन घरी आला. त्याने रशिका हिच्याशी वाद घातला. रात्री १० वाजता घरातील सर्वजण झोपी गेले होते. पहाटे मल्लेश याने झोपलेल्या रशिका यांच्या उजव्या कानावर दगड घातला. रशिका या जोरात ओरडल्या. रशिका यांच्या कानातून रक्त येवू लागले.





