पैशांची गुंतवणूक करताना आपण दोन गोष्टींचा नेहमी विचार करतो. एक म्हणजे पैशाची सुरक्षा. आणि दुसरी चांगला परतावा. पोस्ट ऑफिस विभागाच्या अनेक अशा योजना आहेत. ज्यात या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. पोस्ट ऑफिस ची अशीच एक योजना आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (एनएससी).
पोस्ट ऑफिस ची एनएससी ही योजना आपल्याला बँकेतील एफडीपेक्षा जास्त व्याज देते. पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेवर ६.८ टक्के एवढा व्याजदर आहे. एनएससी मध्ये पैसे गुंतवल्यास वार्षिक व्याज वाढत राहील. पण तुम्हाला हे व्याज आणि गुंतवलेली रक्कम एकाच वेळी काढावी लागेल. एनएससी योजनेचा कालावधी ५ वर्ष आहे.
पाच वर्षानंतरही तुम्हाला गुंतवणूक काढून घ्यायची नसेल तर तुम्ही मॅच्युरिटीनंतर पुन्हा ५ वर्षासाठी मुदत वाढवून घेऊ शकता. पोस्ट ऑफिस च्या एनएससी योजनेमध्ये तुम्हाला १०० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरु करु शकता. जास्त रक्कमेची गुंतवणूक करणार असाल तर कोणतीच मर्यादा नाही.
पोस्ट ऑफिस ची एनएससी ही योजना एक टॅक्स सेविंगचा पर्याय आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम 80 सी अंतर्गत एनएससी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर कर सूट मिळते. एनएससी यावेळी आपल्याला १०० रुपये, ५०० रुपये, १००० रुपये, ५००० रुपये, आणि १०,००० रुपये च्या दराने मिळतील. तुम्ही एनएसएसी मध्ये हव्या तितक्या वेगवेगळ्या किंमतींची प्रमाणपत्रे खरेदी करून गुंतवणूक करू शकता.
५ वर्षात ६ लाख रुपये व्याज
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एनएसएसी मध्ये १५ लाख रुपये गुंतवले तर त्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक रक्कम ५ वर्षात ६.८ टक्के व्याजदराने २०.८५ लाख रुपये होईल. म्हणजेच त्याला फक्त ५ वर्षात सुमारे ६ लाख रुपये व्याज मिळेल.
पोस्ट ऑफीस च्या या योजनेतून पाच वर्षात मिळणार सहा लाख
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -