Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानएक रुपयांत धावेल एक किलोमीटर... महिन्याकाठी होईल तब्बल 6500 रुपयांची बचत

एक रुपयांत धावेल एक किलोमीटर… महिन्याकाठी होईल तब्बल 6500 रुपयांची बचत



फेस्टिव्ह सीझन सुरू झालं आहे. अशातच टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) भारतीय बाजारात उतरवून मोठा धमाका केला आहे. टाटाच्या नव्या इलेक्ट्रिक कारची किंमत थक्क करणारी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही कार एक रुपयात ही एक किलोमीटर धावते. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.

टाटा टियागो ईव्ही कारची किंमत एक्सशोरुम केवळ 8 लाख 49 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही इंट्रोडक्टरी प्राईज आहे. पहिल्या 10 हजार ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

यात कंपनीने 2000 कार आरक्षित ठेवल्या आहेत. ज्या ग्राहकांकडे नेक्सॉन ईव्ही आणि टीगोर ईव्ही आहे, त्यांच्यासाठी कंपनीने या कार आरक्षित ठेवल्या आहेत. मात्र, इंट्रोडक्टरी प्राईजनंतर कारची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केला नाही. टाटा टियागो ईव्ही कारसाठी 10 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होणार आहे. तर जानेवारी 2023 मध्ये ही कार ग्राहकांना डिलिवर करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -