Saturday, February 21, 2026
Homeमनोरंजनराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात मराठीचा डंका, ‘हा’ चित्रपट ठरला सर्वोकृष्ट..

राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात मराठीचा डंका, ‘हा’ चित्रपट ठरला सर्वोकृष्ट..

नवी दिल्ली येथे 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरन सोहळा (ता. 30) पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards) घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती. 2020 साठी हे पुरस्कार देण्यात आले. कोरोना व लॉकडाऊनमुळे हा सोहळा लांबणीवर टाकण्यात आला होता.

‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा’, तर ‘तान्हाजी’ या चित्रपटाला ‘लोकप्रिय हिंदी सिनेमा’चा पुरस्कार मिळाला. याच सोहळ्यात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. अभिनेता अजय देवगण व साऊथ सुपरस्टार सूर्या यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार विजेत्यांची यादी

– सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म : सूराराई पोट्ट्रू
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम
– सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी

– सर्वोत्कृष्ट अभिनेता : सुर्या (सूराराई पोट्ट्रू) आणि अजय देवगण (तान्हाजी)
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालमुरली (सूराराई पोट्ट्रू)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बिजू मेनन (अय्यप्पनम कोशियम)

– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : लक्ष्मी प्रिया चंद्रमौली (शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम)
– सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कार : एके अय्यप्पनम कोशियुम
– सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम (तेलगू)

– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (मी वसंतराव ) व अनिश मंगेश गोसावी (तक्तक)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : नंचम्मा (अय्यप्पनम कोशियम)
– सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : एस. थमन (आला वैकुंठपुरमुलू)

– सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : जस्टिस डिले बट डिलीवर्ड अॅन्ड थ्री सिस्टर्स
– सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम
– सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक

– सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी : डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक
– सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी
– सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला

– सर्वोत्कृष्ट संपादन : शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम
– सर्वोत्कृष्ट मेकअप : नाट्यम
– सर्वोत्कृष्ट पटकथा : सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

– सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन : अय्यप्पनम कोशियुम
– चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्य प्रदेश
– सर्वोत्कृष्ट बालकलाकार : अनिश गोसावी (टकाटक), आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (सुमी)
– सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा : फनरल (मराठी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -