Friday, December 19, 2025
HomeसांगलीSangli : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; ९ लाखाचा गांजा जप्त

Sangli : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; ९ लाखाचा गांजा जप्त

मार्डी येथील काळे वस्ती नजीक ऊस, मका पिकाच्या शेतात तब्बल ९ लाख ९ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी राहुल सिताराम गायकवाड या शेतकऱ्यास अटक केली आहे.

दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मार्डी येथे मका या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती. दहिवडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेशांतर करुन गांजाचे ग्राहक बनून त्याची पडताळणी केली.

तर त्यांना मक्याच्या शेतात गांजाची लागवड दिसली असता पोलिसांनी त्यावर छापा टाकला. यामध्ये ९ लाख ९ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. एनडीपीएस गुन्ह्या अंतर्गत अमली पदार्थ विक्री व उत्पादन प्रकरणी गुन्हा दाखल करून राहुल तुकाराम गायकवाड रा.मार्डी (वय २३) यास ताब्यात घेतले. पुढील चौकशी दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे आणि कर्मचारी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -