Sunday, May 19, 2024
Homeराजकीय घडामोडीशिंदे गटाचा आता आदित्य ठाकरेंच्या युवासेनेवरही डोळा! एकनाथ शिंदेंकडून राज्य कार्यकारिणी जाहीर

शिंदे गटाचा आता आदित्य ठाकरेंच्या युवासेनेवरही डोळा! एकनाथ शिंदेंकडून राज्य कार्यकारिणी जाहीर

शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Udhav thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आता शिंदे गटाने (Thackeray Vs Shine) शिवसेनापाठोपाठ युवासेनेकडे (Yuvasena) आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने युवासेनेची राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. धक्कादायक म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

अशी आहे युवासेनेची राज्य कार्यकारिणी….
– मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे.
– ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे.
– कल्याण- भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
– कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग- विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे.
– पश्चिम महाराष्ट्र : किरण साळी, सचिन बांगर.
– मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील.
– उत्तर महाराष्ट्र : अविष्कार भुसे.
– विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील.

दुसरीकडे, शिंदे गट आणि ठाकरे गट हा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला असून निवडणूक आयोगाच्या कार्यवाईला स्थगिती नाही, असे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गट (Shinde Gut) आणि ठाकरे गटातील (Thackeray Gut) यांच्यातील संघर्ष आणखी तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -