अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत असते. फॅशन्स सेन्स, बोल्ड लुक्स आणि हटके फॅशन सेन्ससाठी उर्फी जावेद चांगलीच ओळखली जाते. उर्फी जावेदला तिच्या कामासाठी जितकी पसंती दिली जाते तितकीच तिच्या लूक आणि फॅशनचीही खूप चर्चा होत असते. नुकताच उर्फी जावेदची एक सोशल मीडिया पोस्ट (Urfi Javed Post) तुफान व्हायरल होत आहे. यावेळी उर्फी जावेद तिच्या फॅशन किंवा बोल्ड ड्रेसिंगमुळे चर्चेत आली नाही तर ती तिच्या बेडरुम फोटोमुळे चर्चेत आली आहे.
नुकताच उर्फी जावेदने एक सोशल मीडिया पोस्ट केली असून त्यामुळे ती चांगलीच खूप चर्चेत आली आहे. उर्फीने बेडरूममधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फी तिच्या बेडरूममध्ये बेडवर एकटीच झोपलेली दिसत नाही. तिच्यासोबत या बेडवर आणखी कोणीतरी झोपलेले दिसत आहे ज्याला पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. उर्फीने इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे नाही तर एका स्टोरीद्वारे हा फोटो शेअर केला आहे.
फोटोमध्ये बेडवर झोपलेली उर्फी दिसत आहे. तिच्या बेडरुममध्ये किंचित अंधार आहे पण उर्फीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. निळ्या रंगाची चादर अंगावर घेतलेली उर्फी फोटोत दिसत आहे. उर्फीच्या बाजूला कोणीतरी झोपलेले दिसत आहे. ही एखादी व्यक्ती नसून उर्फीची लाडकी मांजर आहे. पलंगाच्या एका बाजूला उर्फी आणि दुसऱ्या बाजूला तिची मांजर दिसत आहे. हा फोटो उर्फीच्या बहिणीने, असफीने शेअर केला असून उर्फीने तो पुन्हा शेअर केला आहे. उर्फीच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.