Homeब्रेकिंगबाळासाहेबांच्या नावाने आणखी एक नवी योजना; मुख्यमंत्र्यांची दसरा मेळाव्यापूर्वीच मोठी घोषणा

बाळासाहेबांच्या नावाने आणखी एक नवी योजना; मुख्यमंत्र्यांची दसरा मेळाव्यापूर्वीच मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) वारंवार सांगत असतात. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आता मोठी घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यात 700 दवाखाने (hospital) सुरू करण्यात येणार आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या नावाने हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. तशी घोषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच शिंदे यांनी ही घोषणा केल्याने त्याला अधिक महत्त्व आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीटीव्हीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत 227 ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -