याबाबत अधिक माहिती अशी की , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी दारू ,मटका ,जुगार या अवैध व्यवसायाविरुद्ध जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली आहे . त्या अनुषंगाने पोलिसांनी मार्केट यार्ड येथील गल्ली नंबर दोन या ठिकाणी असलेल्या पान टपरीच्या समोर , मोकळ्या जागेत मटका घेत असताना संध्याकाळी साडेचार चे सुमारास छापा टाकून , आरोपी शंकर धोंडीराम कलगुटगी ,वय 54 वर्ष ,व्यवसाय मजुरी ,राहणार खणभाग सांगली , यास अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त केले आहे . याबाबत पोलीस कॉन्स्टेबल भावना अशोक यादव यांनी आरोपी शंकर धोंडीराम कलगुटगी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली असून , सदर गुन्ह्याचा पुढील तपास , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार ऐनापुरे हे करीत आहेत .
सांगली शहरातील मार्केट यार्ड येथे मटका घेत असताना पोलिसांचा छापा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -