Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडीविधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, अंधेरी पूर्व मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष

विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, अंधेरी पूर्व मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या सर्व जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या जागा महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. निवडणूक आयोगानुसार या सर्व जागांवर 7 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासह, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरियाणातील आदमपूर, तेलंगणा, मनुगोड, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर (राखीव) या जागांवर निवडणुका घेण्यात येणार आहे.

या निवडणुकांमध्ये मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करत शिवसेनेत वेगळा गट स्थापन केला आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा आता त्यांच्याकडून करण्यात येत आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळवण्यासाठी देखील आता शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले आहे. धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला मिळणार हा तिढा अजून सुटलेला नसताना अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

अधिसूचना जारी होण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2022
नामांकनाची अंतिम तारीख – 14 ऑक्टोबर 2022
नामांकनाची छाननी – 15 ऑक्टोबर 2022
नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख – 17 ऑक्टोबर 2022
मतदान – 3 नोव्हेंबर 2022
मतमोजणी – 6 नोव्हेंबर 2022

आमदार रमेश लटकेंच्या निधनानंतर रिक्त झाली जागा

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मदतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिंदे गट आपला उमेदवार देणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा भाजपने आपल्याकडे खेचल्याची माहिती आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र या जागी आता शिंदे गटाऐवजी भाजप आपला उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. या मतदारसंघातून भाजपने मुरजी पटेल यांना दिल्याची माहिती आहे.

ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल सामना रंगणार

या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा थेट सामना होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी होणारी ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. भाजपने ही पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता या जागेवर कोण विजयी होणार आणि लोक कोणत्या उमेदवाराला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -