Friday, July 4, 2025
Homeक्रीडाभारत-दक्षिण आफ्रिका आज पुन्हा भिडणार, ‘असा’ असेल संघ..

भारत-दक्षिण आफ्रिका आज पुन्हा भिडणार, ‘असा’ असेल संघ..

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील T-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटा सामना आज (ता. 4 ऑक्टोबर) संध्याकाळी 7 वाजता इंदौरच्या होळकर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. आता व्हाईट वॉश देण्याकरता अखेरचा सामना जिंकणं भारताला गरजेचं आहे.

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा फॉर्म परतला असून आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, के.एल. राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिकमुळे भारताची फलंदाजी भक्कम स्थितीत असणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर आणि डिज्नी+ हॉटस्टारवर होणार आहे.

भारत: संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चाहर, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका: संभाव्य संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रोस्सू, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, एनरिक नॉर्टजे, वायने परनेल, लुंगी एनगिडी, ट्रिस्टन स्टब्स आणि कागिसो रबाडा, हेनरिक्स, फेलुक्वायो, प्रिटोरियस, तबरेज शम्सी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -