Friday, May 17, 2024
Homeराजकीय घडामोडीखरी शिवसेना कोण? याचं उत्तर गर्दीनं दिलं… गद्दार आम्ही नाही तर तुम्हीच-...

खरी शिवसेना कोण? याचं उत्तर गर्दीनं दिलं… गद्दार आम्ही नाही तर तुम्हीच- एकनाथ शिंदे

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आज इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava) होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) गटाचा दसरा मेळावा वांद्रेतील बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचा हाच खरा दसरा मेळावा असल्याचा दावा केला जात आहे. खरी शिवसेना कोण? याचं उत्तर बीकेसीतील गर्दीनं दिलं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणार नाही, बाळासाहेबांचे खरे वारसदार हा जनसमुदाय आहे. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीसाठी मतदान केलं होते. आम्ही गद्दार नाही तर गदर म्हणजे क्रांती- लढा आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकले, तुम्ही भरकटलात. सत्तेसाठी लाचार झालात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -