ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्धव ठाकरे गटानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देखील निवडणुक चिन्ह मिळालं आहे. निवडणुका आयोगाने शिंदे गटला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट म्हणजेच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हात ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांना आता निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहेत. त्यामुळे आता भविष्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची लढाई ही मशाल विरुद्ध ढाल तलवार अशी रंगताना दिसणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नावं मंजूर केलं होतं. त्यानंतर आज आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.




