Friday, March 20, 2026
Homeकोल्हापूरवंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक...

वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे, सुनेने घरी राहू नये म्हणून सासरे आणि नणंद यांच्याकडून मारहाण, छळ होत असल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आज दाखल झाली.

 

 

तनुजा अभिषेक पुणेकर (३२, रा. रंकाळा टॉवर परिसर) यांनी ही फिर्याद दिली. त्यानुसार सासरे सुरेश बापूसाहेब पुणेकर (७२, रा. रंकाळा टॉवर परिसर) आणि नणंद श्‍वेता संजय कुडाळ (४६, रा. बाजारपेठ गेणुप्रसाद कॉम्प्लेक्स, कुडाळ जि. सिंधुदुर्ग) यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी तनुजा रंकाळा टॉवर परिसरात राहतात. नणंद श्‍वेता आणि सासरे सुरेश यांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तनुजा यांना मारहाण केली. साक्षीदार लता बांदीवडेकर यांच्याशी वाद घातला.

 

तनुजाला मुलगी झाल्यामुळे वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे, तसेच घरी राहायचे नाही, असे सांगून मानसिक व शारीरिक त्रास दिला. उपाशी ठेवून क्रूर वागणूक दिली. घरात राहायचे नाही, अशी धमकी देऊन झाडूच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -