Sunday, February 23, 2025
Homeआरोग्यग्रहणकाळात गाडी चालवताना हेडलाईट्स..घ्यावी विशेष काळजी

ग्रहणकाळात गाडी चालवताना हेडलाईट्स..घ्यावी विशेष काळजी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज म्हणजेच 25 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आहे. भारतात ग्रहण सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे ग्रहण देशात 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल. सर्वप्रथम ग्रहण श्रीनगरमधून दिसणार आहे.



दरम्यान ग्रहणापूर्वी पहाटे 4 वाजून 22 मिनिटांपासूनच सूतक काळ लागला आहे. आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ही अत्यंत

महत्त्वाची घटना आहे. ग्रहणाकडे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होतं. यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर पोहोचत नाहीत.

बऱ्याच जणांना ग्रहण लागतानाचा क्षण कॅमेऱ्यात टिपायचा असतो पण त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी ची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे नाहितर याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

सूर्यग्रहणादरम्यान काहो गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत सूर्यग्रहण पाहण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे योग्य फिल्टर वापरणे, जसे की अल्युमिनाइज्ड मायलार, ब्लॅक पॉलिमर, शेड क्रमांक 14 चा वेल्डिंग ग्लास किंवा दुर्बिणीचा वापर करून सूर्याची प्रतिमा पांढर्‍या बोर्डवर प्रक्षेपित करणे.
सूर्यग्रहणाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी नुसतं आकाशाकडे जरी पाहिलं तरी त्याचे दुसपरिणाम आपल्या डोळ्यांवर होतात . त्यामुळे उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी आकाशात पाहू नका असा साल खुद्द नासा ने दिला आहे.

ग्रहण काळात जर गाडी चालवत असाल तर हेडलाइट्स (headlights) चालू ठेवून चालवा.

सूर्यग्रहण पाहण्यादरम्यान काय चुका टाळाव्या

सूर्यग्रहण पाहताना नेहमीच्या चा पर्याय अतिशय चुकीचं आहे .

ग्रहण रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा वापरणे टाळा. तुम्ही योग्य चष्मा घातला नसल्यास, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे तुमच्या डोळ्यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते.

लहान मुलांना ग्रहणापासून लांब ठेवलेलं केव्हाही उत्तम.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -