ताजी बातमी ऑनलाईन टीम
जगभरात इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपचे लाखो यूझर्स आहेत. आज व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हे सर्व युजर्स प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. अचानक व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले. त्यानंतर ट्विटरवर मीम्स येऊ लागले आहेत. ट्विटरवरही त्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, कंपनीकडून व्हॉट्सअॅप बंद होण्याचे कोणतेही कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. लवकरच सेवा सुरळीत होईल, असे मेटाने म्हटले आहे.
गेल्या तासाभरपासून व्हॉट्सअॅप सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांच्या फोनवर मेसेज येणे बंद झाले, तसेच ज्यांच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप आहे तेही बंद झाले. व्हॉट्सअॅपची यंत्रणा बिघडल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. लवकरच ते सुरळीत केले जाण्याची शक्यता आहे. मात्र असे असतानाचा व्हॉट्सअॅप यूझर्स हे ट्विटरवर वळले आहेत. ट्विटरवर विविध मीम्स व्हायरल होत आहेत. जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अत्यंत मजेदार असे मीम्स व्हायरल सध्या पाहायला मिळत आहेत.