ताजी बातमी ऑनलाईन टीम
टी-20 विश्वचषकचा सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील विजयासोबतच भारताने ग्रुप-2 च्या गुणतालिकेत 8 गुणांसह प्रथम क्रमांकावर राहून उपांत्य फेरी घाठली आहे. या विश्वचषकात 8 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचलेला भारत हा एकमेव संघ आहे.
तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुलचं अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावाती 61 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला केवळ 115 धावांपर्यंत मजल मारता आली. या स्कोअरवर झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ बाद झाला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, त्यापाठोपाठ शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, याशिवाय भूवनेश्वर, अर्शदीप आणि अक्षर पटेल यांनी देखील प्रत्येकी एक विकेट घेतली.
झिम्बाब्वे 115 धावांवर ऑलआऊट! भारताने 71 धावांनी जिंकला सामना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -