Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगमुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात, रिक्षा-डंपरच्या धडकेत 4 ठार

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात, रिक्षा-डंपरच्या धडकेत 4 ठार

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ (Poladpur) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. यानंतर मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून (Maharashtra CM) पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील मृतांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थींनींचा समावेश आहे. या विद्यार्थीनी माणगाव तालुक्यामधील गोरेगाव (Goregaon) येथून रिक्षाने खेडमध्ये परिक्षेसाठी गेलेल्या होत्या. मात्र घरी परतत असताना कशेडी घाटात हा भीषण अपघात झाला.

रायगड (Raigad News) जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यातमधील कशेडी घाटामध्ये सोमवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला. तीन महाविद्यालयीन विद्यार्थीनी या रिक्षाने प्रवास करत होत्या. परीक्षा आटोपून त्या घरी परतत असताना हा अपघात झाला. गोरेगाव येथील या मुली होत्या. परिक्षेसाठी त्या खेड येथे गेल्या होत्या. मात्र घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामध्ये रिक्षाचालकासह या तिघींचाही दुर्दैवी अंत झाला आहे. वाळूने भरलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक झाल्याने रिक्षा पलटी झाली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास सव्वा सात वाजता हा अपघात झाला. वाळूने भरलेला डंबर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेनंतर रिक्षामधील प्रवासी आणि रिक्षा चालक हे वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यामध्ये त्यांनी जागीच प्राण गमावले. अपघातानंतर उशीरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती.

अपघातातील मृतांची नावे
आसिया सिद्दीकी (20 वर्षे)
आलीमा अब्दुल सलाम पोपेरे (23 वर्षे)
नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे)
अमन उमर बहुर (46 वर्षे)
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत
अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -