Saturday, February 21, 2026
Homeतंत्रज्ञानमोबाईल रिचार्जच्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार..? टेलिकाॅम कंपन्या धक्का देणार…

मोबाईल रिचार्जच्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार..? टेलिकाॅम कंपन्या धक्का देणार…

मोबाईल वापरणाऱ्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी झळ बसणार आहे. भारतात लवकरच 5G सेवा सुरु होत असून, आता त्याचा भार ग्राहकांवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. टेलिकाॅम कंपन्या लवकरच मोबाईल रिचार्जचे दर वाढवणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फक्त कॉलिंगच नाही, तर आता इंटरनेटचा रिचार्जही महागण्याची शक्यता आहे.

भारतात काही दिवसांपूर्वीच प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा सुरु केली. प्रमुख शहरांमध्ये ही सेवा मिळू लागली आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेटचा वेग वाढला असला, तरी त्याच वेगाने खिसाही रिकामा होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कशामुळे दरवाढ होणार..?

देशातील 5G सेवेसाठी, तसेच त्याच्या रोलआउटसाठी टेलिकाॅम कंपन्यांनी मोठा खर्च केलाय. शिवाय, 5G सेवा चालवण्यासाठी कंपन्यांना दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळेच टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवणार आहे. पोस्टपेड प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2021 मध्येच टेलिकाॅम कंपन्यांनी दरवाढ केली होती.

किती दरवाढ होणार..?

फिच रेटिंग्ज व जेएम फायनान्स यांच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफ प्लॅनमध्ये 15 ते 20 टक्के वाढ करू शकतात. ही वाढ केवळ प्रीपेड पुरतीच नसून, पोस्टपेड प्लॅनच्या किमतीही वाढू शकतात. मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता, 2 ते 3 हप्त्यांमध्ये केली जाणार असल्याचे जेएम फायनान्शिअलचे म्हणणे आहे.

एकंदरीतच, देशात 5G सेवा सुरु झाली असली, तरी त्याचा भार सामान्य ग्राहकांवर पडणार असल्याचे दिसते. सततच्या वाढत्या महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठाच धक्का असल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -