ताजी बातमी ऑनलाईन टीम
मैत्रिणी सोबत झालेल्या वादास कारणीभूत ठरवून मिरजेतील हायस्कूल रोड येथे एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की यश शेखर पाटील वय 22 राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज यांना गणेश कलगुटगी शुभम लिगाडे राहणार चप्पल मार्केट समोर मिरज आणि संग्राम यादव राहणार ब्राह्मणपुरी मिरज या तिघांनी बेदम मारहाण केली यामध्ये गणेश कलगुटगी आणि त्याची मैत्रीण यांच्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वाद हा यश पाटील यांच्यामुळे झाला.
अशा गैरसमजुतीतून चिडून गणेश कलगुटगी याने त्याच्या हातातील लोखंडी फायटर पंचणे नाकावर ठोसा मारून नाकाचे हाड मोडून गंभीर जखमी केले तर उर्वरित दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत यश पाटील यांनी तिघांचे विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केलेली असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.






