शिवाजी विद्यापीठ विरुद्ध अधिकार मंडळाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विद्यापीठ शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला आहे. मानसशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. विकास मिणचेकर, डॉ. विनायक होणमारे, डॉ. विजयमाला चौगुले यांनी बाजी मारली. निकाल जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
शिक्षक प्रतिनिधी,अभ्यास मंडळ यांचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होईल.तसेच पदवीधर मतदारसंघाचा निकाल रात्री उशिरा जाहीर होईल असा अंदाज विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.