Monday, February 23, 2026
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सॲपचं भन्नाट फिचर, विद्यार्थ्यांना होणार सर्वाधिक फायदा..

व्हॉट्सॲपचं भन्नाट फिचर, विद्यार्थ्यांना होणार सर्वाधिक फायदा..

व्हॉट्सॲपने नुकतेच एकापेक्षा जास्त मोबाईलवर एकच नंबर वर खाते उघडण्याचे फीचर दिले आहे. यासोबतच आपण एका व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये 1 हजार पेक्षा जास्त सदस्यसुद्धा जोडू शकतो, अशी काही आकर्षक फिचर आणले असताना व्हॉट्सॲपने आता आणखी एक भन्नाट फिचर आणले आहे.

तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये प्रश्न विचारल्यानंतर उत्तरांचे जवळपास 12 पर्याय देऊ शकतात. या फिचरने तुम्ही कोणताही एखादा निर्णय घेण्याअगोदर किंवा पर्यायी प्रश्न आणि त्यावर लोकांची मते किंवा कौल काय हे जाणून घेऊ शकता. यालाच आपण मतदान म्हणतो म्हणजेच व्हॉट्सॲपच्या या फिचरचं नाव ‘पोल्स’ असं असणार आहे. ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठीदेखील हे फीचर फायद्याचं ठरणार आहे.

व्हॉट्सॲपच्या या फिचरचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार तर शाळा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांना व शिक्षकांना होईल. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न देऊ शकतात, जेणेकरून विद्यार्थी त्यातील योग्य पर्याय निवडू शकेल आणि त्यांना रिप्लाय करू शकेल. याशिवाय हे फीचर कोणीही सामान्य व्यक्ती वापरू शकेल. जर तुम्ही व्हॉट्सॲप अपडेट केलं असेल तर हे फिचर वापरता येणार आहे किंवा ते हळूहळू काही स्मार्टफोन्समध्ये अपडेट होऊ शकते.

▪️ अँड्रॉइड मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप ओपन केलं की जिथे आपण मेसेज टाईप करतो तेथील चॅट बॉक्सजवळील पेपरक्लिप चिन्हावर टॅप करा.

▪️ आता तुमच्यासमोर मेन्यू उघडल्याचे दिसेल. यादीत शेवटी तुम्हाला पोल हा पर्याय दिसून येणार आहे.

▪️ आता व्हॉट्सॲप तुम्हाला प्रश्न आणि उत्तरासाठी पर्याय तुम्हाला द्यायचे आहेत, हवं सुचवेल ते तुम्ही टाका. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 12 उत्तरांचे पर्याय मिळू शकतात.

▪️ पोल झाल्यानंतर सेंड बटनावर दाबून ग्रुप किंवा चॅटमध्ये पाठवून द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -