Homeमहाराष्ट्रतत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून…नेमकं काय बदललं?

तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून…नेमकं काय बदललं?

रेल्वेने देशात रोज लाखो नागरिक प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. दरम्यान, रेल्वे प्रवास अधिक सुरळीत व्हावा यासाठी रेल्वे विभागाकडून वेळोवेळी तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केला जातो. आतादेखील रेल्वे विभागाने तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केलाय. या नियम बदलामुळे भविष्यात प्रवाशांना तत्काळ तिकीट बुक करणे खूपच सोपे होणार आहे. तसा दावा रेल्वे विभागाने केलाय.

 

येत्या 1 ऑगस्टपासून नियम लागू

भारतीय रेल्वेने आणलेला हा नवा नियम येत्या 1 ऑगस्टपासून लाहू होणार आहे. तिकीट आरक्षण केंद्रांवर होणारी प्रचंड गर्दी, तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आणि प्रवाशांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने टोकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंग अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

नवीन नियमानुसार, प्रवाशांना आता सकाळी ठराविक वेळेत टोकन घ्यावे लागेल. टोकन मिळाल्यानंतर त्यांना सतत रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. टोकनवर नमूद केलेल्या वेळेनुसार आरक्षण काउंटरवर जाऊन तिकीट बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि आरक्षण केंद्रांवरील अनावश्यक गर्दीही कमी होईल.

 

तिकीट बुकिंगसाठी नेमकं काय बदललं?

पश्चिम मध्य रेल्वेने (West Central Railway) या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी तत्काळ तिकिटांसाठी सकाळी 8.30 ते 9.00 या वेळेत टोकन दिले जातील, तर नॉन-एसी तत्काळ तिकिटांसाठी 9.00 ते 9.30 या वेळेत टोकनचे दिले जाणार आहेत. सुरुवातीला प्रत्येक आरक्षण केंद्रावर एसीसाठी 10 आणि नॉन-एसीसाठी 15 टोकन उपलब्ध असतील. प्रवाशांची संख्या आणि मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार रेल्वेकडे असेल. टोकनधारकांचे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर जर जागा शिल्लक राहिल्या, तर ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर इतर प्रवाशांनाही तत्काळ तिकीट मिळू शकेल.

 

नेमके कोणते कागदपत्र लागणार?

रेल्वेने प्रवाशांना आरक्षणासाठी येताना आधार कार्ड किंवा अन्य वैध फोटो ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशाचे नाव, वय आणि प्रवासाशी संबंधित सर्व माहिती आधीच तयार ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल आणि काउंटरवरील विलंब टाळता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -