सांगली शहरातील महागड्या सायकली चोरी करणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण 9 सायकली चोरी प्रकरणातील आठ गुन्हे उघडकीस आले असून नऊ सायकली पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील न उघडकीस आलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेतली होती. या आढाव्या बैठकीमध्ये जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी अशा गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींना चेक करून गुन्हे उघडकेस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते सदरच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील जबरी चोरी घरफोडी मोटारसायकल चोरी या गुन्ह्यातील व अभिलेखा वरील आरोपींवर लक्ष केंद्रित करून गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली असता सांगलीतील शंभर फुटी रोड रामकृष्ण परमहंस सोसायटी कमानी जवळ एक तरुण चोरीच्या सायकली विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून त्याच्या कब्जातील v91 हरिकेन या पोपटी रंगाच्या सायकल सह त्याला ताब्यात घेण्यात आले व विश्वासात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद अली शेख राहणार शंभर फुटी रोड सांगली असे सांगितले. सायकली बाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारले असता त्याने सदरची सायकल ही एक महिन्यापूर्वी शाहू उद्यान समोर सांगली येथून तेजस क्लासच्या पार्किंग लॉट मधून चोरी केली असल्याचे सांगितले. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे समजले त्याच्याकडे आणखी तपास केला असता मोहम्मद अली शेख यांनी सांगितले की दोन महिन्यापासून वेळोवेळी शामराव नगर कोल्हापूर रोड गाव भाग बस स्टॅन्ड परिसर व इतर भागातून सायकली चोरून आणून त्याने तक्षशिला रोड ते शामराव नगर जाणाऱ्या कच्चा रोड लगत असलेल्या काटेरी झुडपात ठेवल्या असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिसांनी पंचांना घेऊन वरील पत्त्यावर जाऊन पोलिसांनी तेथून आठ सायकली ताब्यात घेतल्या. एकूण जागेवरून एक सायकल आणि हस्तगत केलेल्या आठ सायकली असा एकूण नऊ सायकली साने गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केल्या सदरच्या नऊ सायकलींची किंमत 33 हजार रुपये होत असून याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात सायकल चोरीचे विविध आठ गुन्ह्यांची उकल झाली असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली आहे.
सदरचा आरोपी आणि गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रिपोर्टने सांगली शहर पोलीस ठाण्याकडे पुढील तपास करण्यासाठी वर्ग केला असल्याची माहिती दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुधीर गोरे, हेमंत ओमासे, दीपक गायकवाड, सुनील जाधव, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, शुभांगी मुळीक यांनी केली आहे.






