Saturday, August 2, 2025
HomeमनोरंजनDrishyam 2 Collection: ‘दृश्यम 2’ने केली रेकॉर्डब्रेक कमाई, 8 दिवसात जमा केला...

Drishyam 2 Collection: ‘दृश्यम 2’ने केली रेकॉर्डब्रेक कमाई, 8 दिवसात जमा केला 112 कोटी रुपयांचा गल्ला!


बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झाला. 18 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शानदार ओपनिंग करत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. 8 दिवसात या चित्रपटाने 112 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.



अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना स्टारर चित्रपट ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी 8 कोटींचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 112.66 कोटींवर पोहोचले आहे. 100 कोटींचा आकडा पार करणारा हा वर्षातील पाचवा चित्रपट ठरला आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे कौतुक होत आहे. सात दिवसांच्या दमदार कलेक्शननंतर या चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र कलेक्शनचा आकडा घसरल्यानंतरही लोकांमध्ये चित्रपटाची क्रेझ संपलेली नाही.

सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 21.59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 11.87 कोटींचा गल्ला जमवला. ‘दृश्यम 2’ ने पाचव्या दिवशी 10.48 कोटी, सहाव्या दिवशी 9.55, सातव्या दिवशी 8.62 कोटींचे कलेक्शन जमा केले. आता चित्रपटाने आठव्या दिवशी सुमारे 7 कोटींची कमाई केली आहे. तर शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘भेडिया’ चित्रपटाने दृश्यम 2 ला टक्कर देत पहिल्या दिवशी 7.5 कोटींचे कलेक्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -