Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात सोमवारपासून रणधुमाळी; १९७७ केंद्रांवर होणार मतदान

कोल्हापुरात सोमवारपासून रणधुमाळी; १९७७ केंद्रांवर होणार मतदान


कोल्हापूर : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार ९७७ केंद्रांवर मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील ९ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



मतदानासाठी अपेक्षित बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा प्रशासनाच्या तयारीलाही वेग आला आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.२८) पासून सुरू होत आहे.

जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मत आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी एकीकडे उमेदवारांची घाई सुरू असली तरी दुसरीकडे ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असलेले जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत विभागातही प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -