Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरKolhapur KMT : केएमटीला मिळणार नऊ एसी बस

Kolhapur KMT : केएमटीला मिळणार नऊ एसी बस

जवळपास आठ वर्षांनंतर केएमटीच्या ताफ्यात नवीन बस येणार आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार फंडातून प्रत्येकी तीन अशा नऊ एसी बस घेतल्या जाणार आहेत.
त्यासाठी निविदा प्रक्रियेची तयारी सुरू असून, नवीन वर्षात या बस येण्याची आशा आहे. बसची संख्या वाढली तरच वेळेवर बस धावतील, त्यातून प्रवासी वाढून उत्पन्नही व्यवस्थित येणार आहे.

केएमटीची एकूण बस संख्या १२९ आहे. त्यातील ३० बसचे आयुर्मान संपल्याने त्यांचा वापर होत नाही. सध्या केवळ ७० बस रस्त्यावर धावतात. १३ बस स्पेअर पार्ट मिळत नसल्याने बंद आहेत. यामुळे बस संख्या मर्यादित झाल्याने अनेक मार्गावर बसच्या फेऱ्या अतिशय कमी झाल्या. त्यातून प्रवासी संख्या कमी होत आहे. परिणामी केएमटीने ज्या मार्गावर प्रवासी संख्या आहे, तिथेच बसच्या फेऱ्या वाढवण्याचे धोरण ठेवले आहे. त्यातूनही अनेक मार्गावर किमान पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने बस येतात. त्यातीलही काही बस जुन्या असल्याने कधी रस्त्यात बंद पडतील, याचा नेम नाही. या साऱ्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. वडापसारख्या महागड्या प्रवासाशिवाय पर्याय नसल्याने शहरात वडाप वाहतूक जोरात आहे.

या पार्श्‍वभूमीवर केएमटी बस संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ७५ मीडियम आकाराच्या बस घेतल्या होत्या. त्यानंतर ३९ बस घेण्यात येणार होत्या. पण, त्यावेळी परिवहन समितीकडून कार्यवाही झाली नाही. त्यानंतर इलेक्ट्रिक बसचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. पण, शहराच्या लोकसंख्येच्या अटीमुळे तो मंजूर झाला नाही. त्यातील एका बसची किंमत एक कोटीवर जाते. महापालिकेने त्या बस खरेदी कराव्या तर त्यासाठी प्रचंड निधीची गरज आहे. ती शक्यता नसल्याने राज्य सरकार वा केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पर्याय नसल्याने लोकप्रतिनिधींकडे प्रयत्न चालवला होता. आता नवीन घेण्यात येणाऱ्या नऊ मीटर लांबीच्या बससाठी प्रत्येकी किमान ३६ लाख खर्च येण्याचा अंदाज केएमटी प्रशासनाने काढला आहे.

इलेक्ट्रिक बस आल्या तर…

खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्र सरकारकडून खास बाब म्हणून २५ इलेक्ट्रिक बस आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यासाठी त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बस मिळाल्या तर केएमटीच्यादृष्टीने आणखी चांगले होणार आहे. किमान १०० बसचा ताफा झाला तर केएमटी बऱ्यापैकी रुळावर येऊ शकते.

शहरातील लोकसंख्या तसेच पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा नागरिकांना, पर्यटकांना अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी बसेसची गरज आहे. त्यामुळे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव आणि मी असे तिघांनीही बस देण्याचे नियोजन केले. त्यासाठी आमचा आमदार फंड वापरला जाणार आहे.

यासाठी निधी मंजूर असून, तीन आमदारांच्या फंडातून नऊ बस घेतल्या जाणार आहेत. सध्या निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी केली जात आहे. त्यानंतर एक ते दोन महिन्यांत नवीन बस येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -