Wednesday, August 6, 2025
Homeराजकीय घडामोडीपुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का!

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का!

शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि 40 आमदार आता ठाकरे गटाचे आणि इतर पक्षाचे डोकेदुखी ठरले आहेत. दरम्यान शिंदे गट फुटल्यापासून ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. याउलट बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर या गटात इन्कमिंग सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक आमदार, खासदार तसेच पदाधिकांऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलाय.

दरम्यान ,माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करताच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांना उपनेतेपद तसेच प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत कृष्णा हेगडे?

कृष्णा हेगडे यांचा मुंबईतील विले पार्ले भागात प्रभाव आहे. हेगडे यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये भाजपमधून शिवसेनेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.(political news)

कृष्णा हेगडे यांचा राजकीय प्रवास

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक अशी कृष्णा हेगडे यांची ओळख होती. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाल्यामुळे कृष्णा हेगडे यांनी नवा मार्ग स्वीकारला. कृष्णा हेगडे यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी भाजप प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसानंतर हेगडेंनी भाजपची साथ सोडून शिवबंधन बांधलं होतं. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर कृष्णा हेगडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -