आज 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळपासून रिलायन्स जिओचे नेटवर्क नसल्याचे काही युजर्सने ट्विटरवर ट्विट करून सांगितले आहे, यानंतर ट्विटरवर #जिओडाऊन असा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये दिसला. यावरून राज्यात अनेक ठिकाणी जिओ नेटवर्क मुळे ग्राहकांना अनेक समस्या दिसून आल्या आहेत.
आज सकाळपासूनच जिओ युजर्सना कॉल करताना आणि स्विकारताना, एसएमएस पाठवण्यासंबंधी समस्या आल्या आहेत. सकाळी 6 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत युजर्सनी याबाबत तक्रार व्यक्त केली. यानंतर खूप उशिरा म्हणजे जवळपास 3 तासानंतर जिओची ही समस्या सुटली आणि ग्राहकांना नेटवर्क मिळण्या. याशिवाय काही भागांत तर इंटरनेट सेवा सुरळीत सुरू होती, मात्र कॉलिंग आणि एसएमएसविषयी समस्या असल्याचेही दिसले.
आऊटेज डिटेक्शन वेबसाईट डाऊन डिटेक्टरने देखील जिओची सेवा ठप्प झाल्याने शेकडो युजर्स प्रभावित झाल्याचे दाखवले आहे. या माहितीवरून देशभरात जिओ च्या नेटवर्कची समस्या होती, असं दिसून आलं. आता जिओची सेवा अनेक भागांत पूर्ववत झाल्याची माहीती मिळत आहे. पण जिओ युजर्सना या समस्येबाबत जिओने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोणत्या शहरांत जिओची सेवा ठप्प..?
मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, कानपुर, जयपूर, सुरत, बँगलोर, हैद्राबाद या शहरांमध्ये आणि महाराष्ट्रातदेखील पुणे शहरात आणि लगतच्या अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच जिओ नेटवर्क डाऊन झाल्याचं जाणवलं. आता ही समस्या नेमकं कशामुळे झाली हे अद्याप समजलेले नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वीही ऑक्टोबर, जून, फेब्रुवारी महिन्यात युजर्सना ही समस्या जाणवली होती.