Friday, November 22, 2024
HomeबिजनेसDigital Rupee: 1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी लॉन्च होतोय डिजिटल रुपया, कसा कराल वापर?

Digital Rupee: 1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांसाठी लॉन्च होतोय डिजिटल रुपया, कसा कराल वापर?

रिझर्व्ह बँकेकडून 1 डिसेंबरला डिजिटल रुपया लॉन्च करण्यात येणार आहे. चलनाचे हे डिजिटल स्वरूप कसे असणार आहे जाणून घेऊया.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल चलन (Digital Rupee) संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. RBI ने म्हटले आहे की ते 1 डिसेंबर रोजी किरकोळ डिजिटल रुपया (e₹-R) साठी पहिला टप्पा लाँच करेल. E₹-R डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. याला लीगल टेंडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल, असेही आरबीआयने सांगितले. रिझर्व्ह बँकेने 01 डिसेंबर 2022 रोजी किरकोळ डिजिटल रुपयाची पहिला टप्पा लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, RBI ने 31 ऑक्टोबर 2022 रोजीच्या एका प्रेस रिलीजमध्ये सूचित केले होते की, रिटेल डिजिटल रुपयाचा पहिला टप्पा एका महिन्यात सुरू होईल.

कसे वापरावे
e₹-R चे वितरण बँकांमार्फत केले जाईल. डिजीटल वॉलेटद्वारे व्यक्ती ते व्यक्ती किंवा व्यक्ती ते व्यापारी व्यवहार करता येईल. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, वापरकर्ते मोबाईल फोन किंवा उपकरणांमध्ये साठवलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रूपयाद्वारे व्यवहार करू शकतील. जर तुम्हाला दुकानदाराला डिजिटल स्वरूपात पैसे द्यावे लागतील, तर ते व्यापाऱ्याकडे दाखवलेल्या QR कोडद्वारे करता येतील.

यामध्ये आठ बँकांचा सहभाग असेल
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आठ बँकांनी पुढाकार घेतला आहे. पहिला टप्पा स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून देशभरातील चार शहरांमध्ये सुरू होईल. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या प्रकल्पामध्ये सामील होतील.

कागदी नोटांसारखेच मूल्य
त्याचे मूल्य कागदी नोटांइतके असेल. तुम्हाला डिजिटल रुपया हवा असल्यास कागदी नोटा देऊनही मिळवू शकता. रिझर्व्ह बँकेने डिजिटल चलनाची CBDC-W आणि CBDC-R अशा दोन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. CBDC-W म्हणजे होलसेल करन्सी आणि CBDC-R म्हणजे रिटेल करन्सी. भारताची अर्थव्यवस्था डिजिटल स्वरूपात विकसित करण्याच्या दिशेने रिझर्व्ह बँकेचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -