Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनराणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर

राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत. सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.

अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकने विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर धोतरमध्ये हार्दिकही राजबिंडा दिसत होता.

राणादा-पाठकबाईंच्या सप्तपदीचा व्हिडीओ ‘मराठी मीडिया’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जय्य्त तयारी सुरू होती. मेहंदी, हळदी व संगीत सोहळ्यातील फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक होते. आता राणादा-पाठकबाई विवाहबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -