ताजी बातमी ऑनलाईन टीम
तर रिक्षाचा झाला चक्काचूर
मिरजेतील म्हैसाळ ब्रिजवर अशोक लेलंड छोटा हत्तीने ॲटो रिक्षाला ठोकरले.हा अपघात रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला आहे. या अपघातात मिरजेचा रिक्षा चालक जागीच ठार झाला आहे.रिक्षा चालक अब्दुल महंमद शेख वय 30 ,रा बिस्मिला कॉलनी म्हैसाळ रस्ता मिरज जागीच ठार झाला आहे.सदरची रिक्षा घेऊन मिरज कडे येत असताना छोटा हत्ती गाडीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची बातमी कळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.तसेच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. याबाबत शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. मिरज शासकीय रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांची आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती.याबाबत अपघाताची नोंद मिरज शहर पोलिसात करण्यात आली असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.तर छोटा हत्ती चालक फरार असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.