Thursday, July 31, 2025
Homeमनोरंजनपतीसोबत कॉमेडी मुव्हीमध्ये झळकणार Kajol! म्हणाली, 'मै गोपाल से पूछूंगी'

पतीसोबत कॉमेडी मुव्हीमध्ये झळकणार Kajol! म्हणाली, ‘मै गोपाल से पूछूंगी’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सलाम वेंकी’ वरून खूप चर्चेत आहे. कजोलचा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, काजोल या चित्रपटासोबत तिच्या पर्सनल लाईफवरून देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी काजोलचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर आता काजोलचा एक इंटरव्ह्यू समोर आला आहे. त्यात तिने अजय देवगनसोबत चित्रटपटात काम करण्याच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.

बॉलिवूड एक्ट्रेस काजोल याआधी देखील तिच्या पतीसोबत रुपेरी पडद्यावर एकत्र दिसली होती. काजोल लवकरच एका कॉमेडी चित्रपटात अजय देवगनसोबत दिसणार आहे. रोहित शेट्टी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. अशातच काजोलने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मै गोपाल से पूछूंगी’, असं काजोल ‘पिंकविला’शी संवाद साधताना म्हणाली. काजोलच्या उत्तराने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सह संचारला आहे. दरम्यान, ‘गोलमाल’ चित्रपटात अजय देवगनने गोपाल नामक भूमिका साकारली होती. त्यामुळे गोलमालच्या पुढील भागात काजोल आणि अजय देवगन एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

काजोलचा नवा चित्रपट ‘सलाम वेंकी’ येत्या 09 डिसेंबर 2022 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात काजोलसोबत विशाल जेठवा देखील दिसणार आहे. दुसरीकडे, काजोलचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -