Monday, February 23, 2026
Homeक्रीडामहिला आयपीएलच्या तारखांची घोषणा! 5 संघ होणार सहभागी, जाणून घ्या डिटेल्स

महिला आयपीएलच्या तारखांची घोषणा! 5 संघ होणार सहभागी, जाणून घ्या डिटेल्स

आयपीएल 2023 पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. याआधी बीसीसीआय मार्च महिन्यात पहिली महिला आयपीएल आयोजित करण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी 3 ते 26 मार्च दरम्यान महिला आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. महिला T20 विश्वचषक 2023 संपल्यानंतर एका आठवड्यानंतर ही स्पर्धा आयोजित करण्याची योजना आहे. विश्वचषक 10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने 3 ते 26 मार्च दरम्यान महिला आयपीएल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शुक्रवारी बीसीसीआयने पुढील पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी निविदा काढल्या आहेत. 31 डिसेंबर ही निविदा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर 8 जानेवारी 2023 रोजी लिलावाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

पाच संघ होऊ शकतात सहभागी
या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयने महिला आयपीएल आयोजित करण्याची औपचारिक घोषणा केली होती. योजनेनुसार, पाच आयपीएल फ्रँचायझींमध्ये एकूण 22 सामने आयोजित केले जातील. सर्व संघांमध्ये 18 क्रिकेटपटूंचा स्‍क्‍वाड असू शकतो. ज्यामध्ये सहा विदेशी क्रिकेटपटूंचाही समावेश असेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडू जोडले जाऊ शकतात. लीग स्तरावर प्रत्येक संघ इतर चार फ्रँचायझींसोबत प्रत्येकी दोन सामने खेळणार असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे केवळ लीग स्तरावर 20 सामने आयोजित केले जातील. टेबल टॉपरला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल तर एलिमिनेटर फेरी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघामध्ये खेळली जाईल. हा सामना जिंकणारा संघ टेबल टॉपरविरुद्ध विजेतेपदाचा सामना खेळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -