Sunday, December 22, 2024
Homeसांगलीमिरजेत ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना मिरज गुन्हे प्रकटीकरण...

मिरजेत ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना मिरज गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

24 तासांत गुन्ह्याचा छडा,दोन संशयितासह मोटारसायकल आणि गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त

मिरज म्हैसाळ रोड वरील हॉटेल टर्निंग पॉईटचे समोर रोडवर या ठिकाणी दिनांक रविवारी रात्री एक च्या सुमारास होंडा युनिकॉर्न मोटार सायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हर एन रामबाबू मनमध राव वय 55 रा आर एन नगर विजयवाडा आंध्रप्रदेश आणि त्यांचा क्लीनर यांना चाकुचा धाक दाखवुन हाताने मारहाण करून ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांच्याकडील एकूण रोख रक्कम रुपये २२०० /-रूव ट्रक ड्रायव्हरचे ट्रक चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्सची कलर झेरॉक्स प्रत जबरीने काढुन घेतली होती.

याबाबत ट्रक ड्रायव्हर ने मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्याच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला त्याच्या अनुषंगाने तपास करत 1)सागर अनिल बराले वय ३२ व २) अनिलसिंग चंदुसिंग रजपुत वय २७ दोघेही रा जयहींद कॉलनी,स्वामी समर्थ मंदीर जवळ, रेल्वे गेट जवळ, विश्रामबाग, सांगली ता. मिरज जि. सांगली. या दोघांना मिरज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे.दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक संशयित आरोपीकडुन गुन्हयात जबरीने चोरलेली रोख रक्कम, ट्रक चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्सची कलर झेरॉक्स, गुन्हयात वापरलेले हत्यार एक चाकु, मोटार सायकल, तसेच दोन मोबाईल फोन असा रूपये एक लाख तीन हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे सपोनि नितीन सावंत, विष्णु काळे, सचीन सनदी, नागेश मासाळ, सुशील म्हस्के, गजानन बिरादार, दिपक परीट, भाउसाहेब जाधव, बाहुबली गारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -